'बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा...' अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार गटाकडून उत्तर

'बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा...' अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार गटाकडून उत्तर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. गुडीपाडव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल बारामतीत सभा पार पडली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी 'आतापर्यंत तुम्ही साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलं होतं यावरच आता शरद पवार गटाकडून ट्विट करत उत्तर देण्यात आलं आहे.

शरद पवार यांचं ट्विट

घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते... असा पुढारलेला विचार आदरणीय श्री. शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यापेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही !

काय म्हणाले होते अजित पवार?

ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. या निवडणुकीत बारामतीकरांच्या मनात वेगळी भावना आहे. आता कुणाला मतदान करायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी 1991 साली खासदारकीला मला निवडून दिल पुन्हा पवार साहेबांना निवडून दिल त्यानंतर सुप्रियाला निवडून दिल त्यामुळे आता सुनेला संधी द्यायची वेळ आलीये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com