Sharad pawar group protest team lokshahi
ताज्या बातम्या
Thane : शरद पवार गटाचे छगन भुजबळांविरोधात आंदोलन; ठाण्यात कार्यकर्ते आक्रमक
ठाण्यामध्ये शरद पवार गट छगन भुजबळांविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
ठाण्यामध्ये शरद पवार गट छगन भुजबळांविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. शरद पवारांवर भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काल बीड येथे झालेल्या सभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांचा बद्दल विधान केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाण्यात निषेध करण्यात आला. ठाण्यातील पाच पखाडी येथील कार्यालय बाहेर आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळ यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले आहे.