Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार यांची प्रकृती स्थिर; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sharad Pawar) शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवारांना कफचा त्रास झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.

याच पार्श्वभूमीवर रूबी हॉल प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले होते. छातीत कफ असल्याने श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. त्यामुळे शरद पवार पूर्णपणे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घेतील असे सांगण्यात आले होते.

त्यानंतर आता शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Summary

  • शरद पवारांची प्रकृती आता स्थिर

  • पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

  • डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com