Sharad Pawar Meets Pm Moditeam lokshahi
ताज्या बातम्या
दिल्लीत शरद पवार - नरेंद्र मोदींमध्ये गुफ्तगू
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याचे समजते. यावेळी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.
या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, सध्या महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारे आरोप व राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांच्या पाठी लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.