Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

'मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही'; शरद पवार असे का म्हणाले?

'मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही'; शरद पवार असे का म्हणाले?

सूरज दाहाट|अमरावती

राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असली तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अमरावतीत केलं.

तर एकत्र लढण्याची इच्छा आहे पण इच्छा पुरेशी नसते कारण जागावाटप त्यातले प्रश्न याबाबत अजून चर्चा झालेली नाही असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलं त्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीचं भविष्य सध्या तरी अंधातरी दिसतंय. कोणी फोडण्याचा काम करत असेल तर त्यानी करावं आम्ही आमची भूमिका घ्याची ती घेऊ. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com