Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

भाकरी फिरवायची वेळ आलीय, उशिर करुन चालणार नाही; शरद पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय?

मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करकण्यात आलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करकण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे. पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची कशी वर्गवारी करायची ते ठरवा.एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. असे शरद पवार म्हणाले.

यासोबतच पुढे शरद पवार म्हणाले की, भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही. असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com