Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एकच राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या

आता अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, “पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात जी राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com