Admin
बातम्या
फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण; पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकार्यकर्त्यांचा जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला आहे. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला.
त्यानंतर आता NCPच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करुन कार्यकर्ते घोषणाबाजी करत जल्लोष करत आहेत.