“कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील” बहिणीची विचारपूस करायला शरद पवार रुग्णालयात

“कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील” बहिणीची विचारपूस करायला शरद पवार रुग्णालयात

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल ( 25 ऑगस्ट ) सभा झाली. आज शरद पवारांनी त्यांच्या बहीण सरोज पाटलांची भेट घेतली.
Published by  :
shweta walge

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल ( 25 ऑगस्ट ) त्यांची स्वाभिमान सभा पार पडली. तर आज शरद पवारांनी त्यांच्या बहीण सरोज पाटलांची भेट घेतली. आजारी असल्यामुळे सरोज पाटील ह्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात जाऊन शरद पवार यांनी बहिणीची भेट घेतली.

प्रकृती खालावल्यानं सरोज पाटलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील. असा सल्ला शरद पवार यांनी बहिणीला दिला. यावेळी सरोज पाटील यांनी रुग्णालयातील स्टाफची ओळख करुन दिली. सरोज पाटील यांनी यावेळी उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाचं कौतुक केलं.

तसेच सरोज पाटील शरद पवार यांना म्हणाल्या की, ‘डॉक्टरांना जरा तू रागव, कारण ते माझ्याकडून पैसे घेत नाहीत अशी तक्रार त्यांनी शरद पवारांच्याकडे सरोज पाटील यांनी डॉक्टरांसमोरच केली.

“कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील” असं म्हणत त्यांनी बहिणीला सल्ला दिला तर सरोज पाटलांनी पवारांकडे सभेविषयी विचारणा केली.

“कमी बोल, तुझी तब्येत चांगली राहील” बहिणीची विचारपूस करायला शरद पवार रुग्णालयात
लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com