ताज्या बातम्या
Dhairyasheel Mohite Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीची वाट कोणी लावली? विलीनीकरणावरून धैर्यशील मोहिते पाटीलांची टीका
शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरुन अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
सध्या राष्ट्रवादीची विलीनीकरणाची चर्चा सुरूआहे, मात्र 2009 ते 2024 कालावधीत राष्ट्रवादीची वाट कोणी लावली असा टोला माढ्याचे शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली असा टोला अजित पवार यांचे नाव न घेता धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावला.