उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या “मी पूर्ण...

उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या “मी पूर्ण...

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते.

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी नंगानाच चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उर्फी जावेदने थेट महिला आयोगात दाद मागितली आहे.

यात सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

तसेच शर्मिला ठाकरे नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामन्याच्या आयोजकांचे कौतूक केले. तसेच मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com