Shashikant Shinde On Jayant Patil Resigned From State President Post
Shashikant Shinde On Jayant Patil Resigned From State President Post Shashikant Shinde On Jayant Patil Resigned From State President Post

Shashikant Shinde : "रणनीतीवर वेगळ्या पद्धतीने...", जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

शशिकांत शिंदे: जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shashikant Shinde On Jayant Patil Resigned From State President Post: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. शशिकांत शिंदे आता शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 15 जुलैला मंगळवारी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात लोकशाहीच्या प्रतिनिधींनी यांच्यासोबत बातचीत केली आणि अधिक माहिती जाणून घेतली.

शशिकांत शिंदे म्हणाले की, " 15 तारखेला राष्ट्रवादी पक्षाची बैठक होणार आहे, यामध्ये सर्व जेष्ठ वरिष्ठ नेते तेव्हा उपस्थित असतील आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. माझं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. हे मी माझे भाग्य समजतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षासारख्या गटाचा मला प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे, त्याचे मी भाग्य मानतो. येणाऱ्या काळामध्ये पक्षवाढीसाठी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी जे काही शस्त्र वापरते. ज्या पद्धतीने कार्यनीती ठरवून रणनीती ठरवतात, त्याला आता वेगळ्या पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणून याबाबत येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक संघटेने उभे राहून 100 टक्के नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाने जर माझ्यावर जबाबदारी दिली तर आम्ही ती सार्थपणे पार पाडू असे वचन शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com