Shefali Jariwala : शेफाली जरीवालाच्या निधनामागे हार्ट अटॅक की आणखी काय कारण? पतीचा जबाब आला समोर म्हणाला की, "अभिनेत्रीवर..."
Shefali Jariwala Death: प्रसिद्ध, मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधन झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेफाली जरीवाला 'काटा गर्ल' म्हणून प्रसिद्ध होती. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना तिला डान्सची ऑफर आली. त्यानंचर एक डान्सपासून ते बॉलिवूड आणि रिअॅलिटी शोपर्यंत प्रवास केला. शेफालीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिचा पती पराग त्यागीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी मात्र शेफालीला मृत्य घोषित करण्यात आले होते. शुक्रवारच्या मध्यरात्री, सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीच्या अंधेरी येथील घरी पोहोचली. घरात उपस्थितीत असलेल्या व्यक्तींची चौकशी केली. विशेष म्हणजे शेफाली यांच्या कुक आणि मेड यांना तात्काळ अंबोली पोलीस ठाण्यात नेऊन विचारपूस करण्यात आली आहे.
शेफालीचा मृत्यू नेमका कसा झाला?
शेफालीच्या अशा अकाली मृत्यूने सर्वांच्या भुबया उचावल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली काही दिवसांपासून उपचार घेत होती. सुमारे 15 वर्षांपासून त्या एपिलेप्सी (मिर्गी) या आजाराने त्रस्त होत्या. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. खरचं शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाली का यांची चौकशी करत आहेत. तसेच डॉक्टरांनी ही सुद्धा माहिती दिली आहे् की, अभिनेत्री वयाने लहान दिसण्यासाठी गोळ्या औषध घेत होती. त्यासाठी ती दोन गोळ्या घेत होती. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाची औषधे खात होती. परंतू या गोळ्याच्या संबध ह्रदयाशी नाही. त्याफक्त संबंध त्वचा उजळण्यासाठी केला जातो.
नेहमी 'काटा गर्ल' म्हणून राहण्याची इच्छा व्यक्त
शेफाली निधनानंतर आता तिचा मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये पत्रकारांनी विचारले असता, 'काटा गर्ल' म्हणून ओळखीचा कंटाळा आला आहे की? विचारले असता, शेफाली म्हणाली की, "संपूर्ण जगात एकच काटा गर्ल असू शकतो आणि ती मी असल्याचा मला आनंद आहे, मी मरेपर्यंत काटा गर्ल म्हणून ओळखली पाहिजे."
शेफालीच्या मृत्यूनंतर पतीचा जबाब
शेफालीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी मध्यरात्री, सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीच्या अंधेरी येथील घरी पोहोचली. घरात उपस्थितीत असलेल्या व्यक्तींची चौकशी केली. पती परागचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान तो म्हणाली की, "अभिनेत्रीवर उपचार सुरू होते". पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
शेफालीच्या निधनानंतर पतीची अवस्था
शेफाली जरीवालाच्या ह्रदयविकारांच्या झटका आल्याने तिचे अकाली निधन झाले. त्यावेळेस मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाहेर एक व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये तिचा पती पराग हॉस्पिटलमधून बाहेर पडताना एका धक्कादायक अवस्थेमध्ये दिसत होता. त्याचे डोळे पाणावले पाहायला मिळाले होते.