वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार - अंबादास दानवे

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार - अंबादास दानवे

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली.हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात नवीन सरकार आलं.जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असून भविष्यात राज्यात या प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

यासर्व पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबादास दानवे म्हणाले की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार, मात्र खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात आले. अशी टीका अंबादास दानवे यांनी सरकारवर केली आहे,

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार - अंबादास दानवे
वेदांता फॉक्सकॉननंतर आता कोकणातला रिफानरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार?
Lokshahi
www.lokshahi.com