शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दणका; विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत बदल

शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दणका; विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत बदल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका दिलाय.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका दिलाय. विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत बदल झाले असून अनेकाच्या सुरक्षा काढून घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची सुरक्षा काढली आहे. तसेच छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील,सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदार आणि डेलकर परिवाराची सुरक्षा काढलीय. सोबतच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीदेखील सुरक्षा कमी केली आहे. जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा तशीच ठेवण्यात आलीय तर मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आलीय.

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हा त्यातमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. कारण, मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्य्यांवरून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.

अनिल देशमुख; तसेच नवाब मलिक हे माजी मंत्री तुरुंगात असल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com