'अजित पवार कुठे असतील ते समजेल, थोडे दिवस थांबा'; शिंदे गटाच्या 'या' आमदाराने सांगूनच टाकले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र तरीसुद्धा या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट म्हणाले की, सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही, सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे, शिवसेना प्रमुख मला म्हणायचे गर्दी होते मग मतदान का मिळत नाही, त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही.अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवतात आहे, याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते 100 टक्के निर्णय घेतील. असे शिरसाट म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ते मनातून कुठे असेल ते 4 दिवसात कळेल, सगळ्यांना दिसेल. थोडे दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ही सर्वांनाच दिसेल असे ते म्हणाले.