धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

शिवसेना, शिंदे गट आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाची बातमी आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार यावर आज फैसला होण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेना, शिंदे गट आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाची बातमी आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार यावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं याबाबत निवडणूक आयोग आज निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसेना नेमकी कोणाची, यावर निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ‘‘शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे’’ असे शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

यासोबत त्यांनी त्या पत्रात नमूद केले आहे की, ‘‘उद्धव ठाकरे गट हा पक्षाच्या लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याचे पत्र वा प्रतिज्ञापत्र सादर करू शकलेला नाही’’अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणी घेऊन धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला द्यावे, अशी विनंती या गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.

‘‘शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तसेच प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र
धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? फैसला आज होण्याची शक्यता
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com