Dahisar Election : तेजस्वी घोसाळकरांची निवडणूक तयारी वेगात;वार्ड क्र. 6 -7 मधून निवडणूक लढवणार

तेजस्वी घोसाळकर यांनी वार्ड ७ मध्ये दहिसर नदीकाठी "होम मिनिस्टर" कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.
Published by :
Riddhi Vanne

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी वार्ड १ मधून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर, त्यांचे आगामी उमेदवारीचे ठिकाण चर्चेचा विषय बनले आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी वार्ड ७ मध्ये दहिसर नदीकाठी "होम मिनिस्टर" कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. यावरून, त्यांचे वार्ड ६ किंवा ७ मधून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता मजबूत झाली आहे. यामुळे दहिसरच्या निवडणूक समीकरणांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com