मोठी बातमी! एका खाजगी रिसॉर्टवर आदित्य ठाकरेंची आणि शिंदे गटातील 'या' नेत्याची भेट?

मोठी बातमी! एका खाजगी रिसॉर्टवर आदित्य ठाकरेंची आणि शिंदे गटातील 'या' नेत्याची भेट?

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
Published by :
shweta walge

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याच बातमी समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टवर ही भेट झाल्याच समोर येत आहे.

मंत्री दादा भुसे कुठलाही प्रशासकीय दौरा नसतांना अचानक मालेगाववरून नाशिकला आले होते. तर आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा खाजगी असल्याची सुरुवातीला माहिती होती. आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले होते . विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीची मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्यात आली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.


दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे कृषीमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे सरकार आल्यानंतर ते पुन्हा मंत्री बनले. त्यांना बंदरे आणि खाणकाम विभागाचं मंत्रिपद मिळालं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com