Satara
Satara Team Lokshahi

राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्याला शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी भेट दिले वडाचे झाड

उपोषणस्थळी उडाली शाब्दिक चकमक
Published by :
Sagar Pradhan

प्रशांत जगताप|सातारा: कोरेगाव तालुक्यात सध्या चालू असलेल्या वडावडीच्या राजकारणामध्ये आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते रमेश उबाळे यांना वडाचे झाड भेट म्हणून दिले आहे. यावेळी उबाळे यांना जास्त उपोषण करू नका त्रास होईल,तुम्हाला शुगर आहे असे सांगत वडाचे झाड भेट म्हणून दिले. हे झाड देण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात असले तरी हे झाड आणि बुके देताना महेश शिंदे यांना रमेश उबाळे यांनी चिमटा काढला.

तुम्ही झाड देतानाचे फोटो काढताय पण तुमच्या पक्षात प्रवेश केलाय अशा बातम्या देऊ नका अशी कोपरखळी महेश शिंदे यांना मारली. याला महेश शिंदे यांनी आमच्या पक्षात आल्यावर भारी असतं,परत घरी या सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी महेशने यांचे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे यांनी आता फुकट पण नको,ती वेळ आता निघून गेली आहे असे सांगत उपोषणस्थळीच रमेश उबाळे यांना जागेवरच टोला लगावला.यावर राष्ट्रवादीचे उबाळे यांनी मला हौस पण नाही पक्षात यायची असे हसतमुखाने सांगत प्रत्युत्तर दिलं.. यातून महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी खांद्यावर भगवी शाल घ्यावी लागते असे सांगत उबाळे यांनाच पुन्हा लक्ष केलं. उपोषणस्थळी झालेल्या शाब्दिक चकमकीची जिल्ह्यात मात्र खुमासदार चर्चा रंगलीये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com