ठाकरे गटाला एकामागोमाग एक धक्के; संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाकडे

ठाकरे गटाला एकामागोमाग एक धक्के; संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाकडे

विधानसभेनंतर संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलं आहे.

 विधानसभेनंतर संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतले हे कार्यालय आता पूर्णपणे शिंदे गटाकडे जाणार आहे. लोकसभेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी राहुल शेवाळेंना माहिती दिली. त्यामुळे शिवसेना गटाचे कार्यालय हे शिंदे गटाकडे आहे.

निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव हे एकनाथ शिंदेंना दिलेले होते. त्यामुळे ती सध्या खरी शिवसेना आहे असे मानले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com