पेपर ठाकरेंचा जाहीरात शिंदे, फडणवीसांची; चर्चा तर होणारच

पेपर ठाकरेंचा जाहीरात शिंदे, फडणवीसांची; चर्चा तर होणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत.मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत.मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. दरवेळी शिवसेनेचा अग्रलेख सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना आपल्याला दिसून येतो.

मात्र आज चित्र वेगळे आहे. आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या जाहीरातीची चर्चा चांगलीच रंगली आहे. या जाहीरातीत त्यासोबत मेट्रोसह इतर विकास कामांचे फोटोही दाखण्यात आले आहेत. मोदींच्या फोटोच्यावर मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असे नाव लिहिले आहे. लाभ वितरण प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण, 2 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार असे लिहिण्यात आले आहे.

यासोबतच भूमिपूजन

17,182 कोटींचे 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन (वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर) प्रतिदिन क्षमता : 2464 दशलक्ष लिटर. यामुळे 80% लोकसंख्येला लाभ होणार

बृहन्मुंबई महापालिकेच्या 3 रुग्णालयांचे 9,108 कोटी खर्चासह बांधकाम व पुनर्विकास (गोरेगाव, भांडुप, ओशिवरा) यामुळे 25 लाख गरजूंना लाभ होणार

6.076 कोटी खर्चासह 400 कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा 2,813 कोटी खर्चासह पुनर्विकास, वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारती हरित प्रमाणित होणार

लोकार्पण

मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व डी. एन. नगर) 16,410 कोटी खर्चासह 18.6 कि.मी मार्गिका आणि 17 स्थानके

मैट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) 16,208 कोटी खर्चासह 16.5 कि.मी. मार्गिका आणि 13 स्थानके

बृहन्मुंबई मनपाच्या 20 नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण, मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत 147 रक्त चाचण्या, विविध डॉक्टरांचा मोफत सल्ला

वेळ, तारीख आणि स्थळ

त्यानंतर शेवटी या जाहिरातीत कार्यक्रमाची वेळ आणि तारीख देण्यात आली आहे. गुरुवार, 19 जानेवारी वेळ : दुपारी 4 वा, एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथेही सभा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अशा आशयाची जाहीरात शिवसेनेचा अग्रलेख सामनातून छापण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com