Kalyan : कल्याणमध्ये शिंदेना मोठा धक्का! उपतालुका प्रमुख भाजपाच्या वाटेवर
(Kalyan Rural Sub-Talukhu Head Vikas Desale) कल्याण-डोंबिवली परिसरातील राजकीय तापमानात मोठी वाढ घडवून आणणारी घडामोड आज समोर आली. शिवसेना (शिंदे गट) चे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी अखेर भाजपची वाट धरली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या हालचालीला महत्त्व लाभले असून शिंदे सेनेतील आणखी एक महत्त्वाचा ‘शिलेदार’ घर सोडल्याने गटात नाराजीची लाट पसरल्याचे बोलले जाते.
डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पक्षनेते दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत देसले यांनी भाजपची मफलर गळ्यात परिधान करत अधिकृत प्रवेश केला. ग्रामीण भागात सक्रिय असलेल्या देसले यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थनार्थ मोठा कार्यकर्तावर्गही भाजपात सामील झाला. यामुळे स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजकीय हालचाली वेग घेत होत्या. अखेर देसले यांनी शिंदे गटाचा निरोप घेत भाजपात प्रवेश केल्याने समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. देसले यांच्या नेतृत्वावर ग्रामीण भागात विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते असल्याने त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला तळागाळात नवा जोम प्राप्त झाल्याचे पक्षनेत्यांनी म्हटले.
भाजपात नव्या प्रवेशांची मालिका सुरू असतानाच देसले यांच्या जोडण्यामुळे पक्षाचा कल्याण ग्रामीण परिसरातील प्रभाव अधिक भक्कम होईल, असा आनंद व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे शिंदे गटात या सततच्या गळतीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील स्पर्धा अधिक चुरशीची बनणार असून, या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय पेढ्यांत नवी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.