Shivsena Help Flood Victims : पूरग्रस्तांना शिवसैनिकांचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंचा फोनवरून संवाद
Shivsena Help Flood Victims : सध्या पाऊस महाराष्ट्रामध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे जास्त प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास काढून घेतल्यासारखी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्यासारखे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत.
गेल्या महिन्यांत पावसाची जोरदार बॅंटीग चालू होती. त्यामुळे अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतामध्ये चक्क कमरेपर्यंत पाणी पाहायला मिळत होते. त्यामुळे पुरता हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. लांब असणाऱ्या शिवसैनिकांनी मेळाव्याला न येता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधवावर जाऊन दसरा साजरा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कळंब तालुक्यातील आथर्डी गावातील ग्रामस्थांना आधार देण्याचा निर्णय घेतला. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भगवान देवकाते, अजित पिंगळे, नितीन लांडगे यांनी काल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे घर स्वच्छ केले.
शिवसेने केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आता नवी उमेद आल्याचे दिसत आहे. त्या कीटमध्ये जीवाश्यक वस्तू तसेच धान्य असल्याने शेतकऱ्यांच्या घरी दसरा साजरा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः व्हिडिओ कॉल करत कुटुंबाशी संवाद साधला आहे. कुटुंबाशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, "या घरातील महिला भगिनींनी शिंदे यांना आपटयाचे पान देत आपल्या लाडक्या भावाला बहिणीकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देत असल्याचे सांगितले."