Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

संजय राऊत: शिंदे यांच्या जाहिरातीवरून बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा आरोप.
Published by :
Riddhi Vanne

Sanjay Raut on Eknath Shinde Ad : एकनाथ शिंदेंच्या जाहीरातीत बाळासाहेबांच्या बरोबरीने जिल्हाध्यक्षांचा लावणे म्हणजे बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा कट असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळांतून चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, "हा काय ब्रँड आहे. ब्रॅडी आहे. त्याला नशा देखील नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या campaign var दीडशे ते पावणे दोनशे कोटी खर्च झाला आहे. अमरावतीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नमस्कार करतानाच्या होंर्डिंग रस्त्यावर अनेकठिकाणी लावले. त्यांना हेही भान नाही कुठे लाव तो आपण कुठे ही बॅनर लावले आहे. मुतारी इथे लावले."

पुढे संजय राऊत म्हणाले की, "शिंदे यांचे नेते मोदी आहे. तुम्ही बाळासाहेबाच्या बाजुला जिल्हाप्रमुखाचे फोटो लावता. ही कोणती नवी पद्धत आणली. आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँड चे महत्व कमी करायचं आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का?"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com