शिवसेना एकत्र! महापालिका निवडणुकांनंतर भाजपला मिळाला जबरदार फटका
Shiv Sena Thackeray Group Shiv Sena Shinde Group Alliance : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या निवडणुकांत भाजपने आघाडी घेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या स्थानावर राहिला. अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती. मुंबईतही ही युती यशस्वी ठरली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर शिंदे गटानेही समाधानकारक कामगिरी केली. मात्र ठाकरे गट आणि मनसेची आघाडी अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकली नाही.
आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. लवकरच मतदान आणि त्यानंतर निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यात बार्शीनंतर माढा तालुक्यातही राजकीय समीकरणं बदलली आहेत.
माढ्यात भाजपला टक्कर देण्यासाठी दोन्ही शिवसेना गट आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले आहेत. या चार पक्षांनी मिळून स्वतंत्र पॅनल उभारल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या आघाडीचे नेतृत्व धैर्यशिल मोहिते पाटील आणि अभिजीत पाटील करत आहेत. भाजपविरोधात सर्व पक्ष एकवटल्याने माढ्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या नव्या युतीचा प्रचार लवकरच सुरू होणार असून निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
भाजपने या निवडणुकांत आघाडी घेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
शिवसेना शिंदे गट दुसऱ्या स्थानावर राहिला.
अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाने युती लढवली होती; मुंबईतही ही युती यशस्वी ठरली.
भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर शिंदे गटानेही समाधानकारक कामगिरी केली.
ठाकरे गट आणि मनसे अपेक्षेप्रमाणे यशस्वी होऊ शकली नाही.

