ताज्या बातम्या
Sanjana Ghadi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश; 'उबाठा' गटाला मोठा धक्का
अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी त्यांचे पती संजय घाडी यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
संजना घाडी यांच्यासोबत तब्बल १८ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात मुंबईतील काही शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटसंघटिका यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे शिंदे गटात स्वागत केले.