Shivsena
ShivsenaTeam Lokshahi

अकोल्यात शिवसेनेने मारली बाजी, भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ

राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरु असताना आता राज्यातल्या ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत.
Published by :
shweta walge

राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरु असताना आता राज्यातल्या ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. आजच्या ग्रामपंचायती निकालात भाजप आणि शिंदे गटाचे वर्चस्व कायम आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायती निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यातच भाजप आणि शिंदे गटाला चांगलाच धक्का मिळाल्याच पाहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीचे निकाल

अकोट तालुका :

1) गुल्लरघाट : सरपंचपदी बच्चू कडूं यांच्या प्रहार समर्थीत पॅनलचे प्रकाश डाखोरे विजयी.

2) पोपटखेड : सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचितचे विजेंद्र तायडे विजयी. पांडुरग तायडे संपूर्ण बहूमतासह विजयी.

3) शिवपूर-कासोद : सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष माया मनिष महल्ले विजयी.

4) धारगड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष संजय मानिक ठाकरे विजयी.

5) धारुर-रामापूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजू धुंदे विजयी.

6) अमोना : मदन बाबूलाल बेलसरे हे अपक्ष उमेदवार सरपंचपदी बिनविरोध निवडून आले.

7) सोमठाणा : सरपंचपद अर्जच न आल्याने रिक्त आहे.

बाळापूर तालुका

8) व्याळा : सरपंचपदी शिवसेनेचे गजानन वजीरे 1529 मते घेत सरपंचपदी विजयी.

Shivsena
नंदुरबार ग्रामपंचायतीत भाजपचेच वर्चस्व!
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com