शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; कोल्हेंना देणार टक्कर

शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; कोल्हेंना देणार टक्कर

शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Published by :
shweta walge
Published on

शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यांसह २०० पदाधिकारींनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार शिरुरची उमेदवारी जाहिर करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे अमोल कोल्हेंविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होणार आहे.

दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने आढळरावांनी मनगटावरील शिवबंधन न सोडता घड्याळ चढवलं आहे. सुमारे दोन दशकानंतर आढळरावांनी घरवापसी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com