राज्य पातळीवर चाललेल्या राजकारणाचा आणि आमचा काही संबंध येत नाही - आ.शिवेंद्रराजे भोसले
Admin

राज्य पातळीवर चाललेल्या राजकारणाचा आणि आमचा काही संबंध येत नाही - आ.शिवेंद्रराजे भोसले

भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतलीये.
Published by  :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आले असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आणि केळघर येथील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी आलो असल्याचे सांगत राज्य पातळीवर चाललेल्या राजकारणाचा आणि आमचा काही संबंध येत नाही.

देवेंद्र फडणवीस यांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचे आमदार काम करू. कास येथील अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढल आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्री यांनी 154 बांधकामे रेग्युलरराईज करण्याचा निर्णय झाला असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com