Shivneri: शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह; सोहळ्याला फडणवीस, शिंदे यांची उपस्थिती
१९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. ज्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहेत. अशा या रयतेच्या राजाने आतापर्यंत जिंकलेले गडकिल्ले अनेकांनी सर केले आहेत.
आजच्या पिढीला स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवनेरीसह संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शिवाई देवीची शासकीय महापूजा केली आणि अभिषेक करत शिवजन्मोत्सवास सुरूवात करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. त्याचसोबत सर्व शासकीय अधिकारींनी देखील आपली उपस्थिती लावली.