Rahul Kanal on Kunal Kamra : "शिवसेना स्टाइलने स्वागत करु...", राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा

Rahul Kanal on Kunal Kamra : "शिवसेना स्टाइलने स्वागत करु...", राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा

शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणालला धमकीवजा इशारा दिला आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

सध्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्याला अटक करण्याची मागणीदेखील केली होती . दरम्यान आता मुंबई पोलिसांनी कुणालला दोन वेळा चौकशीसाठी समन्सदेखील बजावले. मात्र तो चौकशीसाठी हजर झाला नाही. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणालला धमकीवजा इशारा दिला आहे.

राहुल कनाल म्हणाले की, "कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा त्याचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु. तसेच कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं", असं देखील राहुल कनाल म्हणाले आहेत.

अशातच दुसऱ्या समन्सला कुणाल कामरा हजर न राहिल्याने पोलीस त्याच्या घरी पोचहोले. कुणाल कामरा मुंबईत आहे की नाही याबाबत माहितीदेखील घेतली. कुणाल कामरा आमच्याही संपर्कात नसल्याची वडिलांनी दिली पोलिसाना माहिती दिली. चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स पोलिसानी कामराला बजावले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com