आगलावे बोम्मई, वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?”सामना’तून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आगलावे बोम्मई, वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?”सामना’तून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

कर्नाटक सीमेची एक इंच जागाही महाराष्ट्राला देणार नाही. असे म्हटले होते. यावर बोलताना राऊत यांनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

कर्नाटक सीमेची एक इंच जागाही महाराष्ट्राला देणार नाही. असे म्हटले होते. यावर बोलताना राऊत यांनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला होता. केंद्रात भाजपचे सरकार आहे. चीनला एक इंचही जागा देणार नाही, असे भाजप सरकार सांगत असते. चीनने घुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे आम्हीही कर्नाटकात घुसखोरी करु. घुसखोरी करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र आम्ही मानतो की हा देश एक आहे. हा वाद चर्चेने मिटू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक याप्रकरणात भडकवण्याचे काम करत आहेत. असे राऊत म्हणाले होते.

यावर बोम्मई यांनी खासदार राऊत यांना ट्विट करुन प्रतिउत्तर देत म्हणाले की, बोम्मई यांनी राऊतांवर टीका केली आहे. बोम्मई म्हणाले की, संजय राऊत हे देशद्रोही आहेत, संजय राऊत हे चीनचे दलाल आहेत. राऊत हे चीनच्या बाजूने आहेत. ते देशाची एकात्मता व अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जर अशीच वक्तव्य करत राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे . हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली! बोम्मई यांनी एक सांगावे , त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे ? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल! असे सामनातून म्हटले आहे.

“गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करूनदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपला हेका आणि ठेका सोडायला तयार नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक चिघळला आणि उफाळला तो फक्त बोम्मई यांच्यामुळेच. सीमा प्रश्नाचे घोंगडे सर्वोच्च न्यायालयात भिजत पडले असताना बोम्मई यांनी एक इंच काय, अर्धा इंचही जमीन महाराष्ट्रास देणार नाही, असा फटाका फोडला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या हद्दीतील सांगली, सोलापूर वगैरे भागांतील गावांवर हक्क सांगितला. या आगलावेपणाची खरेच गरज होती काय?” असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

यासोबतच “आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते (बोम्मई) महाराष्ट्राच्या नावाने कडाकडा बोटे मोडत राहिले व केंद्रीय गृहमंत्री शहांनी चर्चेस बोलावले तेव्हा, ‘‘ते ट्विटर अकाऊंट माझे नाहीच. त्यावर कोण काय लिहिते त्याच्याशी आपला संबंध नाही,’’ अशा प्रकारची भूमिका घेतली. हा एक विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे लोक दिल्लीत सीमाप्रश्नी बैठकीसाठी गेले तेव्हा फक्त पंधरा मिनिटांत हारतुरे, स्वागत, फेटा बांधणे व चर्चा असे सोपस्कार आटोपून दोन्ही राज्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी असे ठरले, पण दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली,”असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com