Sanjay Raut यांचे भाऊ Sunil Raut माध्यमासमोर; संजय राऊतांची ED चौकशी सुरू

Sanjay Raut यांचे भाऊ Sunil Raut माध्यमासमोर; संजय राऊतांची ED चौकशी सुरू

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Sanjay Raut यांचे भाऊ Sunil Raut माध्यमासमोर; संजय राऊतांची ED चौकशी सुरू
Sanjay Raut : EDची धाड पडताच राऊतांच्या घराबाहेर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन सुरू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com