Sanjay Raut ED Raid :  संजय राऊतांनी खिडकीतून हात उंचावताच शिवसैनिकांचा जल्लोष..!

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे.सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे. राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी (shivsena) राऊत यांच्या घराच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे सातत्याने खिडकीतून डोकावून पाहत बाहेरचा अंदाज घेत होते. याच वेळी जेव्हा खा. संजय राऊत यांनी खिडकीतून हात उंचावले त्यावेळी बंगल्याबाहेर असलेल्या (Shivsainik) शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. खासदार संजय राऊत यांना पाहताच शिवसैनिकांनी घोषणा सुरू केल्या की, संजय राऊत आगे बढो..हम तुम्हारे साथ है..!

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी खिडकीमध्ये येऊन बाहेरचे वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता तर ते बराच वेळ फोनवर बोलत होते. त्यानंतर अचानक संजय राऊतांची एन्ट्री झाली आणि स्टाईलमध्ये हात उंचावून त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. राऊतांना पाहून शिवसैनिकांमध्ये शिवसैनिकांचा उत्साह संचारला.

Sanjay Raut ED Raid :  संजय राऊतांनी खिडकीतून हात उंचावताच शिवसैनिकांचा जल्लोष..!
Sanjay Raut ED Raid : ईडीच्या धाडीनंतर राऊतांचे वकील मैत्री बंगल्यावर पोहचले; म्हणाले…

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com