मुंबईमध्ये 'हाऊसिंग जिहाद', शिवसेना नेते संजय निरुपम यांचे गंभीर आरोप
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केलेले वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. मुंबईमध्ये सध्या हाऊसिंग जिहाद होत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. काही बिल्डर खूप चलखीने मुंबईचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही निरुपम म्हणाले. सरकारी योजनांमध्ये बांगलादेशींची नावे सामील झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे आता संजय निरुपम यांनी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाची एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
संजय निरुपम म्हणाले की, "मुंबईचा भूगोल बदलण्याचा अनेक बिल्डर प्रयत्न करत आहेत. एसआरएमध्ये ज्यांची नोंदणी आहे ते 60 बिल्डर मुस्लिम आहेत. मुंबईमध्ये मुस्लिम समुदायाचे आमदारही या बिल्डर्सना सहकार्य करत आहेत. त्यामुळे विकासकांच्या सर्व कागदपात्रांची पडताळणी करण्यात यावी. तसेच मुस्लिम बिल्डरांनी पुनर्विकास केलेल्या सोसायटीमध्ये हिंदू लोकांना घरं दिली जात नाहीत असा आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे.