Shivshahi Bus Accident
Shivshahi Bus AccidentTeam Lokshahi

Pune Breaking: शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

उरळीतील सासवड रोडवर झाला अपघात.

चंद्रशेखर भांगे | पुणे: मध्यरात्री पुण्यामध्ये एस. टी. महामंडळाच्या शिवशाही या बसचा अपघात झाला आहे. शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्ती हा कंटेनरचा चालक असल्याची माहिती आहे. तर 6 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

Shivshahi Bus Accident
दौलताबाद किल्ल्याच्या नामांतरणाविषयी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांचं मोठं वक्तव्य

पुण्याजवळील देवाच्या उरळीत शिवशाही बस आणि कंटेनरचा हा भीषण अपघात झाला आहे. उरळी फाट्या येथे असलेल्या एका गोडाऊन अचानक रस्त्यावर आलेल्या कंटेनरला धडक दिल्याने शिवशाही बस मधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com