Shocking Elimination Is Sonali Raut Evicted From The House
Shocking Elimination Is Sonali Raut Evicted From The House

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यात 'ही' स्पर्धेक बाहेर जाण्याची शक्यता

बिग बॉस मराठी सीझन ६ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीच्या काही आठवड्यांत घरात रंगत वाढलेली पाहायला मिळाली. नुकताच या सीझनमधला पहिला एलिमिनेशन झाले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shocking Elimination : बिग बॉस मराठी सीझन ६ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीच्या काही आठवड्यांत घरात रंगत वाढलेली पाहायला मिळाली. नुकताच या सीझनमधला पहिला एलिमिनेशन झाला आणि प्रसिद्ध लावणी कलाकार राधा पाटील घराबाहेर पडली.

तिसऱ्या आठवड्यात तब्बल आठ स्पर्धक धोक्यात होते. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रूचिता जामदार हे सर्व नॉमिनेशनमध्ये होते. मात्र सोनाली राऊत हिची अडचण अधिक वाढली.

मागील आठवड्यात तिने कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. बिग बॉसच्या घरात टास्क न खेळणं गंभीर मानलं जातं. त्यामुळे बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केलं. यावर होस्ट रितेश देशमुखनेही नाराजी व्यक्त केली.

‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेशने सोनालीला स्पष्ट शब्दांत सुनावलं. “हा हट्ट घराबाहेर ठेवा. इथे आलात तर खेळावंच लागेल,” असं त्याने ठणकावून सांगितलं.आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार सोनाली राऊतचा प्रवास इथेच थांबलेला दिसतो. तिचा टास्क न खेळण्याचा निर्णय तिलाच महागात पडल्याचं स्पष्ट होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com