मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात गोळीबार, कुख्यात गुंड गणेश जाधवचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात गोळीबार, कुख्यात गुंड गणेश जाधवचा मृत्यू

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गणेश हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार होता.

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गणेश हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार होता. त्याच्या साथीदारांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयाबाहेर संताप व्यक्त केलाय. मृत गणेश जाधव याचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. गणेश जाधव याचा मृतदेह आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यात आली. मृतक गणेश जाधव याचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका चालक थेट वर्तक नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. दुसऱ्या रुग्णवाहिकेतून गणेश जाधव याचा मृतदेह पोलीस संरक्षणातून पुढे पाठवण्यात आला.

नौपाडा येथील घंटाळी परिसरात शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथे रिक्षा मधून तीनजण आले होते. त्यांनी येथील बांधकाम व्यवसायिक बाबा माने याच्या कारची काच फोडली. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर तिघेही निघून गेले. काहीवेळाने पुन्हा हे तिघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील दुकानात काम करणारा अश्विन गमरे याच्या छातीखाली डाव्या बाजूस गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर तिघेही आरोपी पळून गेले.

गणेश जाधव याच्याविरोधात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्याचा सामावेश आहे. तर विपीन विरोधातही चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. तिथे गोळीबार केल्यानंतर ते पुन्हा येऊरला गणेश जाधव याच्यावर हल्ला करण्यासाठी गेले. तिथे त्याला गोळ्या झाडल्या. येऊरच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु संध्याकाळी त्याला मृत घोषित करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com