CNG : पंपांवर सीएनजीचा तुटवडा; गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही

पुण्यात सीएनजी तुटवडा पाहायला मिळतंय. गेल्या ३ दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यात सीएनजी तुटवडा पाहायला मिळतंय. गेल्या ३ दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही आहे. तुडवड्यामुळे सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षाच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. सकाळी 10 पासून रिक्षाचालक लाईन मध्ये उभे आहेत. कुठीलीही नोटीस ग्राहकांना देण्यात आली नव्हती. पाइपलाइनचे काम सुरू असल्याने पुरवठा बंद आहे, मात्र टोरंट आणि MNGL कडून कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे काही पंप बंद आहेत, तर काही ठिकाणी 2 किलोमीटरचा रांग बघायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com