Rohit Pawar X post : "... हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे"
Rohit Pawar X post : "... हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे" आंदोलकांच्या गैरसोयीवरुन आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा Rohit Pawar X post : "... हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे" आंदोलकांच्या गैरसोयीवरुन आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा

Rohit Pawar X post : "... हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे" आंदोलकांच्या गैरसोयीवरुन आमदार रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांवर रोहित पवारांचा सवाल
Published by :
Riddhi Vanne
Published on

"... should be called a sign of dictatorship" MLA Rohit Pawar Targets Government Over Inconvenience To Protesters : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. सकाळी 10.00 वाजता मुंबईतील आझाद मैदानावरुन त्यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली आङे. दरम्यान कोर्टाने त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाकारली असली तरी पोलिसांनी विशिष्ट अटींसह केवळ एक दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. याचपार्श्वभूमीवर आझाद मैदानावरील जरागेंच्या आंदोलनावरुन आणि आंदोलकांच्या गैरसोयीवरुन आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय लिहिले आहे रोहित पवारांनी?

आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com