Shradha Murder Case
Shradha Murder CaseTeam Lokshahi

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा, श्रद्धाची आणि तिच्या मित्राची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

श्रद्धा वालकर आणि तिच्या मित्रांमधील 24 नोव्हेंबर 2020 मधील व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल

सध्या देशात श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येची प्रचंड चर्चा आहे. सर्व देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसांदिवस नवनवीन खुलासे होत आहे. श्रद्धाची हत्या करणाऱ्या अफताब पूनावाला यानं केलेले क्रूरकर्मामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे सर्व देशाचे लक्ष या प्रकरणाकडे आहे. आता याच प्रकरणात हत्या झालेल्या श्रद्धा वालकरची व्हॉट्सअॅप चॅट समोर आली आहे. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे.

या चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफताब श्रद्धाला मारत होताच, त्याशिवाय तो तिचं मानसिक शोषणही करत होता, असं या चॅट्समधून समोर आलेय. श्रद्धाचा एक जुना फोटो व्हायरल होतोय, यामधून अफताबची क्रूरता दिसत आहे. श्रद्धा वालकर आणि तिच्या मित्रांमधील 24 नोव्हेंबर 2020 मधील व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल झालेय. श्रद्धा मित्राला अफताबकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगत आहे.

श्रद्धानं व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय म्हटलेय?

काल त्याच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्व काही ठिक झाले होते.

तो आज जात आहे.

पण मी आज जाणार नाही, कारण त्याने काल मला खूप मारलेय. माझा ब्लड प्रेशर कमी झालेय. शरिरावर जखमेच्या खुणा आहेत. अंगात ताकदच उरली नाही, बेडवरुन उठूही शकत नाही.

तो माझ्या घरातून जातोय, हे मला निश्चित करायचेय.

माझ्यामुळे तुला झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतेय. अशी ती मित्राला चॅट मध्ये मित्राला म्हणत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com