Shraddha Murder Case
Shraddha Murder Case Team Lokshahi

श्रद्धा हत्याकांड : आज आफताबची नार्को टेस्ट होणार

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आज मोठे खुलासे होऊ शकतात. आज आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आज मोठे खुलासे होऊ शकतात. आज आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी (दि.18) दिल्लीतील कोर्टाने या संदर्भात निर्देश दिले आहेत. नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात.

Shraddha Murder Case
Video : रस्त्यावर बसलेल्या वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यादरम्यान आफताब, त्याचे करिअर आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील. आफताबने श्रद्धा वालकरला का मारले हे लवकरच कळणार आहे. तिच्या शरीराचे तुकडे कुठे फेकले गेले? हत्या का केली? आफताब ड्रग्ज घेतो का? याशिवाय आफताबकडून अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विशेष म्हणजे खुनाशी संबंधित प्रकरणात सामान्यतः नार्को चाचणी केली जाते, ज्याच्या मदतीने अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर किंवा त्याच्या माध्यमातून तपासाला वेग येऊ शकतो.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com