ताज्या बातम्या
संत गजानन महाराज यांचा आज 147वा प्रकट दिन; लाखो भाविक शेगावात दाखल
आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे.
आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. संत गजानन महाराजांचा 147 वा प्रगट दीन उत्सव आज शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमन जाते. लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
सकाळी 7.00 वाजता प्रातः आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली असून सकाळी 10.00 वाजता यागाची पूर्णाहुती अवभृतस्नान तर दुपारी श्रींच्या पालखीचा नगर परीक्रमा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येत आहे.