श्री वैभव लक्ष्मी ही देवी लक्ष्मीचे एक रूप आहे. जी संपत्ती, समृद्धी आणि समृद्धीची देवी मानली जाते. शुक्रवार हा दिवस विशेषतः लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी वैभव लक्ष्मीचे व्रत करण्याची प्रथा आहे. वैभव लक्ष्मी व्रत हे धन-संपत्ती, सुख-समृद्धी आणि घरात लक्ष्मीचा वास टिकून राहावा यासाठी केले जाते. प्रामुख्याने श्रावणाच्या मासात या व्रताला सुरूवात केली जाते.
हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवार असे केले जाते. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरात किंवा मंदिरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. 'श्रीसूक्त' किंवा 'कनकाधारा स्तोत्रा' चे पठण करावे. नैवेद्य म्हणून गूळ, खीर किंवा मिठाई अर्पण करावी. व्रत कथेचे वाचन करावे. शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करावे.
हे व्रत केल्याने धन-समृद्धी प्राप्त होते. घरात सुख-शांती नांदते. मनोकामना पूर्ण होतात. अखंड सौभाग्य प्राप्त होते.
व्रताच्या दर शुक्रवारी सायंकाळी वैभव लक्ष्मी देवीची विधीवत पुजा मांडावी. देवीचा साज-शृंगार करावा. फुल अर्पण करावं. गोडाचा नैवेद्य दाखवावा. दर शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पुस्तकातील कथा वाचावी. या दिवशी उपवास धरल्यास उत्तम असते. सायंकाळी पुजा संपन्न झाल्यावर उपवास सोडावा.
व्रताचे 11 किंवा 21शुक्रवार झाल्यानंतर उद्यापन करावं. उद्यापनालाही विधीवत पुजा मांडून पुस्तक वाचावं. तसेच 7 किंवा 11 कुमारीका किंवा सुवासिनींना हळदी-कुंकू, फुल, वाण आणि वैभव लक्ष्मीचं पुस्तक भेट म्हणून द्याव. त्यांना नैवेद्य द्यावा. मनोभावे देवीची उपासना केल्यास फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.