Shubhanshu Shukla : भारतीयांसाठी गौरवशाली दिवस! लखनऊचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले

Shubhanshu Shukla : भारतीयांसाठी गौरवशाली दिवस! लखनऊचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले

नासा आणि स्पेसएक्सच्या ‘Axiom-4’ (Ax-4) मोहिमेंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आज दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अवकाशात झेपावले.
Published by :
Team Lokshahi
Published on

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नासा आणि स्पेसएक्सच्या ‘Axiom-4’ (Ax-4) मोहिमेंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आज दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अवकाशात झेपावले. भारताच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवत शुभांशू शुक्ला याने अंतराळात झेप घेतली. मोहिमेच्या प्रमुख स्थानी पॅगी व्हिटसन हे आहेत. फाल्कन-9’ रॉकेटच्या माध्यमातून ‘ड्रॅगन कॅप्सूल’ अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले असून यामध्ये शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम पाहणार आहेत.

भारतासाठी आजचा दिवस हा गौरवशाली दिवस आहे. कारण ही तसेच आहे. भारतातील लखनऊ मध्ये राहणारे शुभांशू शुक्ला ह्यांनी नासाच्या Axiom-4’ (Ax-4) मोहिमेंतर्गत नासाच्या स्पेस केनेडी सेंटरच्या लॉन्च पॅड 39A येथून अंतराळात झेप घेतली. 1984 ली पहिल्यांदा भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधीत्व करत शुभांशू शुक्ला यांनी अंतराळ स्थानकात झेप घेतली. 'स्पेसएक्स'चे 'फाल्कन-9' हे रॉकेट 'ड्रॅगन' कॅप्सूल घेऊन यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाले आहे.

'फाल्कन-9' रॉकेटने 'ड्रॅगन' कॅप्सूलला कक्षेपर्यत पोहोचवले असून फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून ह्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. बुस्टरमधील बिघाडामुळे बरेच दिवस लांबणीवर पडलेले 'फाल्कन-9' रॉकेट हे आज अखेर लॉन्च झाले आहे. 'ड्रॅगन कॅप्सूल' ही एक 'क्रू' (Crew) आणि 'कार्गो' (Cargo) दोन्हीसाठी वापरली जाणारी 'स्पेसक्राफ्ट' असून आज याच 'स्पेसक्राफ्ट मधून शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर अंतराळात जाण्याचा महत्वाचा प्रवास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com