Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या ऐवजी शुभमन गिल उपकर्णधार पदाची जबाबदारी?
Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या ऐवजी शुभमन गिल उपकर्णधार पदाची जबाबदारी? भारतीय T-20 संघात बदलांची चर्चाAsia Cup 2025 : हार्दिक पंड्या ऐवजी शुभमन गिल उपकर्णधार पदाची जबाबदारी? भारतीय T-20 संघात बदलांची चर्चा

Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या ऐवजी शुभमन गिल उपकर्णधार पदाची जबाबदारी? भारतीय T-20 संघात बदलांची चर्चा

आशिया कप 2025: शुभमन गिलला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्याची शक्यता, हार्दिक पंड्या उपलब्ध नसल्याने बदलांची चर्चा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता शुभमन गिलला टी-20 आंतरराष्ट्रीय संघातही मोठी भूमिका मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत गिलला भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात येऊ शकते. सध्या सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे कर्णधार म्हणून पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. हार्दिक पंड्या उपलब्ध नसल्याने गिल उपकर्णधारपदी येऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. गिलच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची फलंदाजी आणखी बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

मात्र, गिल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मागील काही सामन्यांत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे गिल सलामीला उतरेल की तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, याबाबत चर्चा सुरू आहे. गिलने आयपीएलमधील आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने टी-20 संघातील दावेदारी मजबूत केली आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने 890 धावा केल्या होत्या, तर 2023 मध्ये 426, 2024 मध्ये 650 आणि 2025 हंगामातही उत्कृष्ट कामगिरी करत संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवले. आता चाहत्यांचे लक्ष आशिया कपमध्ये गिलच्या उपकर्णधारपदाच्या घोषणेकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com