ताज्या बातम्या
Sindhudurg Tourist Beaten : चहात माशी पडल्याची तक्रार केल्याचा राग, पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकला हॉटेल मालकाने केली बेदम मारहाण
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने हॉटेल मालकाला सांगितले. या क्षुल्लक गोष्टीचे रूपांतर भांडणात झाले. परिणामी नंतर मारामारी झाली. यावेळी हॉटेल मालकाने पर्यटकाला हॉटेल मालकासह इतर 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.