Silver Price Hike : एकाच दिवसात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांनी वाढ
थोडक्यात
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही मोठी वाढ
एकाच दिवसात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांनी वाढ
दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ
( Silver Price Hike ) सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दराने देखील उसळी घेतली आहे. ट्रम्प यांचे टॅरिफ रेट धोरणामुळे चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार होत आहेत. चांदीचा तुटवडा जाणवत असल्याने भाव वाढत चालला असल्याचे बोलले जात आहे. यातच आता चांदीमध्ये भावामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून काल एकाच दिवसात चांदीच्या भावात 15 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
या भाववाढीमुळे चांदी एक लाख ९५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. चांदीसह सोन्याच्या दरातही मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 28 हजार रुपयांवर आहेत. दिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरांचे भाव वाढल्याने सोने-चांदी खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.