Helium Day : विजयदुर्ग किल्लावर साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'

Helium Day : विजयदुर्ग किल्लावर साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'

हेलियमच्या शोधाच्या निमित्ताने आजचा दिवस म्हणजे 18 ऑगस्ट रोजी जागतिक हेलियम दिन साजरा केला जातो.
Published by  :
Siddhi Naringrekar

हेलियमच्या शोधाच्या निमित्ताने आजचा दिवस म्हणजे 18 ऑगस्ट रोजी जागतिक हेलियम दिन साजरा केला जातो.विजयदुर्गच्या ज्या ठिकाणी हेलियमचा शोध लावण्यात आला त्या ठिकाणी या ठिकाणचे नागरिक आणि विद्यार्थी हेलियम दिन साजरा करणार आहेत.

विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आजचा दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करतात. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून या वायूला हेलियम हे नाव देण्यात आले. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायूचा शोध लावण्यात आला.

विजयदुर्गवर ज्या ठिकाणाहून हेलियमचा शोध लागला त्या जागेला साहेबांचा कट्टा असं म्हटलं जातं. विजयदुर्ग किल्यावर जोसेफ नॉर्मन लॉकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने 18 ऑगस्ट 1868 रोजी हेलियम वायूचा शोध घेतला.

हायड्रोजननंतर हा दुसरा हलका वायू आहे. वायू प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. स्कुबा डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये म्हणून हा वायू उपयुक्त ठरतो. हा बिनविषारी वायू आहे. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्युलस जेनसिन याने सूर्यग्रहणाच्या वेळी पिवळ्या ज्वाळेच्या रुपात हेलियम शोधला. 30 वर्षांनंतर स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम रॅमसे याने युरेनियमच्या खाणीत हा वायू शोधला. स्कुबा डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये म्हणून हा वायू उपयुक्त ठरतो

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com